*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामभाऊ मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना परिवाराचे सर्वेसर्वा बाबुरावजी आप्पा बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव आप्पा बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव म ता माळशिरस येथे शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारीवर्ग यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शिबिराचे उद्घाटन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असून ग्रामीण भागात ज्यांनी रक्तदान चळवळ उभारून जास्तजास्तीत वेळा रक्तदान केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे
जि प शाळेतील विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार असून
महाराष्ट्र शासनच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्वच्छता अभियानाचा भाग म्हणून गावातील प्रमुख ठिकाणी सफाई केली जाईल तरी ओंकार परिवार प्रेम करणाऱ्या व ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान वतीने रामभाऊ मगर यांनी आवाहन केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा