Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

*मंगरुळ ता.तुळजापूर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक गैबीपीर उरूस उत्साहात साजरा*

 *मंगरुळ -प्रतिनिधी* 

चांदसाहेब शेख

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


तुळजा पूर तालुक्यातील मंगरुळ येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या प्रामदैवत गैबीपीर उरूस गुरुवार ३० जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला


पहाटे पाच पासून मंगरूळसह परिसरातील तीर्थ बु. तीर्थ खु, सरडेवाडी, खोताची वाडी, बीजनवाडी, भांतबर्वी येथील हिंदू मुस्लिम भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रीघ लावली होती गैबीपीर यांना नवस बोलल्यास नवस पूर्ण होतो                 


           अशी भाविकांची श्रद्धा असून तो नवस याच उरूस कालावधीत पूर्ण केला जातो. बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या या दरगाह परिसरास हिरव्यागार डोंगररांगामुळे एक वेगळंच आकर्षण आषाढ निर्माण होते                               



      यामुळे मन प्रसत्र होऊन एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असल्याचे भविकातून बोलले जाते. उरूस कमिटीच्या वतीने महाप्रस-ादाचे (खिर) वाटपही करण्यात आले       


               या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला उरूस उत्साहात साजरा करण्यासाठी माजी सरपंच सत्तार मुलाणी, पत्रकार तथा उरूस कमिटीचे हुसेन मुलाणी,महामुद मुलाणी,बावालाल मुलाणी, हमीद मुलाणी आदीं. विश्वस्तासह चार ते पाच गावातील भाविकांनी परिश्रम घेतले. आणि या महाप्रसादाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा