Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

उजनी धरणातून भीमा नदीत ८१ हजार तर वीर धरणातून नीरा नदीत ६० हजार क्युसेक्सचा विसर्ग, नरसिंहपूर येथील संगमावर १ लाख ४१ हजारचा विसर्ग

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*


          पुणे घाट माथ्यावरील पावसाचे पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उजनी धरणाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून संभाव्य पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून भिमा नदीत ८१ हजार क्युसेक्स तर विर धरणातून नीरा नदीत ६० हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ४१ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. भीमा नदीवरील तीन बंधारे व गणेशवाडी गारअकोले पूल पाण्याखाली गेला आहे.



     पुणे परिसर व पश्चिम घाट मथ्यावर होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे उजनी धरणावरील सर्व धरणे फुल्ल झाली असून सर्वच धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. संभाव्य पूर परिस्थिती गंभीररूप धारण करू नये यासाठी उजनी धरण पूर नियंत्रण कक्षाकडून भीमा नदी पात्रामध्ये सकाळी ६० हजाराने सोडण्यात येणारा विसर्ग वाढवून सायंकाळी चार वाजता 80 हजार क्पेयुसेक्स करण्यात आला आहे. 

     तर वीर धरणात वरील परिसरातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रात ३५ हजार क्युसेक्स पाणी सोडणे सुरू होते. त्यामध्ये आज दोनदा वाढ करून ६० हजार क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी सध्याला दुधडी भरून वाहत असून काठावरील गावांना सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे.

      उजनी धरणातून भीमा नदीत ८१ हजार ६०० क्यूसेक्स तर वीर धरणातून नीरा नदीत ६० हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत असून नरसिंहपुर येथील संगमावर एक लाख ४१ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदी काठावरील गावांना सतर्कतचा इशारा प्रशासनाने दिला आहे. भीमा नदीवरील नरसिंहपुर, टनु व भांडगाव येथील बंधारे पाण्याखाली गेले असून यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच गणेशवाडी गाराअकुले यांना जोडणारा भीमा नदीवरील पुलावर सायंकाळी आठ वाजता दोन फूट पाणी वाहू लागल्याने यावरीलही वाहतूक बंद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु नागरिक आपला जीव धोक्यात घालून बिनधास्तपणे एजा करताना दिसत आहे.

     दरम्यान भीमा नदीतील पाण्यात सकाळपासून वाढ होऊ लागल्यामुळे नदी काठावरील माढा व इंदापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी आपल्या विद्युत मोटारी केबल व स्टार्टर काढण्यासाठी नदीकाठावर गर्दी केली होती. तसेच वाढणारे पाणी पाहण्यासाठी नदीवरही नागरिकांनी गर्दी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले प्रशासनाच्या वतीने कोणीही इकडे फिरकले नसल्याचे दिसून आले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा