उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळीनगर,ता.२१:संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त गट नंबर दोन येथील रुक्मिणी हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.गेली ३० वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या सेवायज्ञांतर्गत यंदा १३२ वारकरी बंधू-भगिनींना मोफत आरोग्यसेवा व औषधोपचाराचा लाभ देण्यात आला.
तसेच पालखीतील दिंडीसाठी महाप्रसाद (भोजन) पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा सुमारे २०० वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. 'वारकऱ्यांची सेवा म्हणजेच श्री विठ्ठलाची सेवा' या भावनेतून आरोग्यसेवा व अन्नदानाचा उपक्रम पुढेही अधिक समर्पितपणे सुरू ठेवणार असल्याचे डॉ. अविनाश जाधव व डॉ.निसर्गराज जाधव यांनी सांगितले.
फोटो ओळी-
माळीनगर(ता.माळशिरस):वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा देताना डॉ.निसर्गराज जाधव




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा