Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

*देहू ते पंढरपूर मार्गावरील माळशिरस तालुक्यातील महाळुंग जवळ" भक्ती शक्ती "नाम फलकाचे अनावरण*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


देहू ते पंढरपूर या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर महाळुंग हद्दीत कुबेर नर्सरी समोर शक्ती भक्ती नाम फलकाचे अनावरण देहू संस्थांचे माजी अध्यक्ष दिलीप महाराज मोरे देहुकर यांच्या हस्ते करण्यात आले.          

           याप्रसंगी बाळासाहेब मोरे महाराज, प्रल्हाद मोरे महाराज,विश्वस्त बापूसाहेब मोरे महाराज,राजाराम महाराज निकम वाघोली तसेच जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, मराठा सेवा संघाचे प्रदेश संघटक उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बोके,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटक अक्काताई माने, छायाताई सपकाळ, भीमराव रेडे पाटील महाळुंग, पोलीस उपधीक्षक संपतराव भोसले, या जागेचे मालक कुबेर रेडे व वैशाली रेडे,हनुमंतराव चव्हाण, राकेश रेडे, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी तसेच वारीत सामील झालेले बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मराठा सेवा संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी दिंडीतील वारकरी आणि आर्वी माने, उर्वी माने, पुष्कराज माने ही बालमंडळी उपस्थित होती.


                  मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या गुरु शिष्याच्या नात्याला उजाळा देण्यासाठी शक्ती भक्ती नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून या दोन संत महापुरुषांचा वास्तववादी इतिहास समोर ठेवण्याचा प्रयत्न असून भविष्यात या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराजांचे भव्य शिल्प उभारण्याच्या मानस उत्तमराव माने यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या परिसराला महत्त्व येणार असून छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराज यांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या नाम फलकाचे उद्घाटन झाल्यामुळे व हे उद्घाटन देहू संस्थांच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत झाल्यामुळे या कार्यक्रमाला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहीम मुलानी तसेच रेडे परिवारातील सर्व लोकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा