Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२६

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापती पदी प्रशांत घुले तर उपसभापतीपदी विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा, मंगळवार, २२ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी प्रशांत घुले तर उपसभापती पदी विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापती, उपसभापती, तज्ज्ञ संचालक तसेच निमंत्रित संचालक पदांच्या निवडी इंदापूर येथील संस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक श्री. शिवरकर  यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडल्या.

संस्थेचे मावळते सभापती अनिल शिंदे व उपसभापती सौ. संजीवनी गरगडे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर या निवडी करण्यात आल्या.


यामध्ये सभापतीपदी इंदापूर गटाचे प्रतिनिधी प्रशांत घुले यांची तर उपसभापतीपदी बावडा गटाचे प्रतिनिधी विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ संचालक म्हणून काझड केंद्राचे केंद्र प्रमुख व सणसर बीटचे विस्तार अधिकारी श्री. सांगळे  यांची तर दुसरे तज्ज्ञ संचालक म्हणून काटी केंद्रातील आदर्श शिक्षक मिलिंद देटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय निमंत्रित संचालक म्हणून भोसले वस्तीचे उपक्रमशील शिक्षक समाधान भोंग यांचीही एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी मावळते सभापती अनिल शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा आढावा घेत, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विवेचन केले. नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  नानासाहेब नरुटे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सर्वांसमोर  मांडला. शिक्षक संघाचे नेते दत्तात्रेय तोरस्कर  व शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतीश शिंदे यांनीही नूतन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाला शुभेच्छा देत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संस्थेचे माझी सभापती व संचालक यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्याकडूनही शुभेच्छांचा वर्षाव सभापती उपसभापती यांच्या वर करण्यात आला.

यावेळी नूतन अध्यक्ष प्रशांत घुले म्हणाले, आदरणीय श्री. जावडेकर सर यांनी स्थापन केलेली ही संस्था शतकाकडे वाटचाल करत असून पतसंस्थेचे सहकारात चांगले नाव आहे. सर्वांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून पारदर्शी कारभारास सर्वोच्च प्राधान्य देवू. सभासदांचे आर्थिक हित संवर्धन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सचिन देवडे यांनी तर जुन्या पेन्शन संघटनेचे माजी अध्यक्ष सचिन दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या निवड प्रक्रियेस इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांतील मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षक संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते. उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात बिनविरोध झालेल्या या निवडीमुळे उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा