Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० जुलै, २०२६

*जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश.* *सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण संपन्न झाले स.मा.वि प्रांगणावर*

 *अकलूज-- प्रतिनिधी*

   *केदार लोहकरे* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज सोमवार दि. २० रोजी सकाळी ८-३० वाजता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने रथावर ३ जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवष्टी केली व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.         


             प्रारंभी पालखी सोहळ्यातील तुकारामांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये निरस्नान घालण्यात आले. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले.


          सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत पालखी सोहळ्याचे स्वागत  जिल्हाधिकारी एन.कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळके, प्रांताधिकारी विजया पांगारकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,तहसीलदार सुरेश शेजुळ,सोलापूर विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाच्या मान्यवरांनी केले.            


                                            पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल,प्रांताधिकारी उत्तम दिघे,गटविकास अधिकारी सचिन खुडे,तहसीलदार जीवन बनसोडे, व विविध खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातून पालखीची सूत्रे सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली.                          

          सकाळी ९-१५ वाजता पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीतील गांधी चौकात आगमन झाले.यावेळी अकलूजकरांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सौ.   नंदिनीदेवी मोहिते पाटील,माजी आ.रणजितसिंह मोहिते पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते पाटील,नगराध्यक्ष रेशमा अडगळे,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील आदी मान्यवरांनी स्वागत केले.  


                           गांधी चौकातून पालखी सोहळा विठ्ठल मंदिराकडे ग्रामप्रदक्षिणेसाठी गेला.सकाळी  १०-१५ वाजता सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचे रिंगण सोहळ्यासाठी आगमन झाले.पालखीची पाद्य पूजा,आरती व देवाच्या अश्वाचे पूजन संग्रामसिंह मोहिते पाटील, ऋतुजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी स्वरूपाराणी मोहिते पाटील,सयाजीराजे मोहिते पाटील उपस्थितीत होते. तर अश्वाचे पूजन डॉ.धवलसिंह मोहिते पाटील,उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील व सौ.धनश्री घुले पाटील उपस्थित होते.रिंगण सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले,मोहिते पाटील परिवारातील सदस्य,शासकीय अधिकारी व मान्यवर प्रमुख उपस्थित सकाळी ११ वाजता रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. रिंगणात  सुरुवातीला पताकाधारकांनी ३ फे-या धावत पूर्ण केल्या.        




             ज्ञत्या नंतर तुळशीधारक व हंडेकरी महिला,वीणेकरी,टाळकरी  वैष्णवांनी रिंगणात धावत एक फेरी पूर्ण केली.त्यानंतर दोन्ही अश्विनी धावत रिंगणात पाच फेऱ्या पूर्ण केल्या.तसा उपस्थित लाखो भाविकांनी तुकोबारायाचा एकच  जयघोष केला.                         अश्वांच्या पायाखालील रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी वैष्णवांनी तोबा गर्दी केली.मैदानावर पारंपारिक खेळही सादर केले.शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यातील प्रमुखांचा व विश्वस्तांचा सन्मान कतण्यात आला.


या वर्षी दूरदर्शनवरील विविध मालिकेतील नावाजलेल्या कलाकरांनी संत तुकाराम महाराज सोहळ्यास उपस्थिती लावली.यामध्ये झी टिव्हीवरील "होम मिनिस्टर" मालिकेतील संपुर्ण महाराष्ट्रात वहिनींचे आवडते भाऊजी *आदेश बांदेकर*,"चला हवा येवू द्या" मालिकेतील संपुर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहचलेले *भाऊ कदम*,"पारू फ्रेम" *संजना पाटील* यांनी उपस्थित राहिल्यामुळे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांना या नावाजलेले कलाकारांना जवळून पहाण्याची संधी मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा