Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

करमाळा बाजार समितीच्या संचालक पदी वीट येथील हनुमंत चांदणे यांची निवड

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


.देशभक्त कै . नामदेवराव जगताप साहेब व कै  आण्णासाहेब जगताप पासून सर्वसामान्यांतील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देण्याचा संस्कार माझ्यावर आहे म्हणून मी जगताप गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता हनुमंत चांदणे सर यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  संचालक पदाच्या रिक्त जागी बिनविरोध निवड केली आहे . त्यांनी पदावर बसवून नेता बनण्या पेक्षा जनतेचे पाईक, दास व सेवक बनून सर्वसामान्यांची सेवा करावी असे प्रतिपादन मा . आ . जयवंतराव जगताप यांनी सत्कार समारंभात केले 

.करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त असलेल्या ग्रामपंचायत अनुसूचित जाती - जमाती या मतदारसंघातील संचालक पदी वीट येथील जगताप समर्थक हनुमंत चांदणे यांची निवड करण्यात आली आहे .करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत अनुसूचित जाती - जमाती मतदार संघातील रिक्त असलेल्या जागी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वीट येथील हनुमंत चांदणे यांची  निवड करण्याचा ठराव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर केला . हनुमंत चांदणे यांची बाजार समितीच्या संचालक पदी केलेल्या निवडीस जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड  यांनी अधिसूचनेद्वारे प्रसिद्धी दिलेली आहे .  

जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निष्ठेची कदर केल्यामुळे व वीट गावाला बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यामुळे वीट ग्रामस्थांनी माजी आमदार जगताप यांचे आभार मानले .  बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत माजी आमदार जगताप यांनी चांदणे  यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी बोलताना चांदणे यांनी माजी आमदार जगताप यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले व माझ्यासारख्या दलित समाजाच्या कार्यकर्त्याला तालुका पातळीवर  शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली व विश्वास टाकला त्या विश्वासास पात्र राहून काम करेल अशी ग्वाही दिली 

यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, जि.प सदस्य गणेश चिवटे, प्रशांत पाटील, पं.स.चे उपसभापती ॲड अजित विघ्ने, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे,बाजार समितीच्या उपसभापती सौशैलजा मेहेर ,संचालक  युवा नेतेशंभूराजे जगताप,नवनाथ बापू झोळ ,रामदास गुंडगिरे, सागर दोंड , सौ मनीषा देवकर, जनार्दन नलवडे, मधूकर गाडे ,तात्यासाहेब शिंदे ,महादेव कामटे, शिवाजी राखुंडे ,नागनाथ लकडे ,काशिनाथ काकडे, कुलदीप पाटील ,मनोज पितळे, परेशकुमार दोशी, वालचंद रोडगे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष महादेव डुबल, संचालक शहाजी शिंगटे, दादासाहेब लबडे,हनुमंत ढेरे,अनिल चोपडे , भगवान गिरी , तात्यासो जाधव , अशोक राऊत , पप्पू चोपडे , राजेंद्र गाडे , रविंद्र ढेरे ,दादासाहेब कोकरे ,वैजीनाथ कदम, दिलीप ढेरे, आनंदकुमार ढेरे, बाळासाहेब ढेरे, शिवराज जगताप ,नगरसेवकयुवराज चिवटे ,सचिन अब्दुले, अहमद कुरेशी,चेतन आलाट ,विक्रांत मंडलेचा, विलास जाधव , गणेश ढेरे, रविंद्र वळेकर, विनय ननवरे 'अजित पाटील , दिपक भोज ,नसरुल्ला खान, मुख्याध्यापक सुनिल शिंदे , विठ्ठल रोडगे , किरण भागडे ,यांचे सह वीट ग्रामस्थ व्यापारी शेतकरी व तालुक्यातून सर्व स्तरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .

यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत ,युवा नेते शंभूराजे जगताप,अजित विघ्ने, गणेश चिवटे, नवनाथ झोळ,देविदास ढेरे, महेश गणगे, विनय ननवरे यांनी मनोगत व्यक्त केले श

.सभेचे सुत्रसंचलन प्रा दत्तात्रय भागडे यांनी केले .शेवटी आभार उप सभापती बबनराव मेहेर यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा