*करमाळा तालुका -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9850686360*
विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेल्या व्यक्तींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रशासन व सामान्य लोकांच्यामध्ये दुवा म्हणून काम करावे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज करमाळा तालुक्यातील विशेष कार्यकारी अधिकरीपदी निवड झालेल्यांना सदस्यांना निवड पत्र प्रदान कार्यक्रमात बोलताना केले
करमाळा तालुक्यातील २४ जणांची जिल्हाधिकारी सोलापूर यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदिदी बागल व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारशीवरून निवडलेल्या या सदस्यांना करमाळा कार्यालयात भाजपा नेते दिग्विजय बागल व विलासराव घुमरे यांच्या हस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले आहे. यावेळी बोलताना विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे म्हणाले की विशेष कार्यकारी अधिकारी हे पदाच्या माध्यमातून निवडलेल्या व्यक्तींना सामान्य विद्यार्थी व गरजूंना मदत करण्याची संधी मिळाली आहे. याचा फायदा त्यांना झाला पाहिजे यासाठी कोणत्याही वेळ व काळाचे बंधन न पाळता त्यांना मदत करावी
या कार्यक्रमाला आदिनाथ चे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे श्री.मकाईचे संचालक सतीश बापू निळ रेवन्नाथ निकत आशिष गायकवाड, रामभाऊ हाके,नितीन तकीक शिवाजी कदम यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले तर आभार रोकडे यांनी मानले
चौकट:
करमाळा तालुक्यातील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे अतुल बदर शिल्पा पाटील (साडे) राजकुमार कोरे (पाथर्डी) अक्षय शेंडगे (गोयेगाव )अनिल पवार (हिवरवाडी )विजयसिंह मोहोळ (केम) नितीन निमगिरे ( जेऊरवाडी )रेश्मा इंगोले (कोंढेज) बलभीम कांबळे (पोफळज) शिवाजी पिसाळ ( झरे) लक्ष्मण खोमणे (गुलमोहरवाडी )दत्तात्रय सरडे (करंजे) सोनाली क्षीरसागर (केडगाव) भाग्यश्री बर्डे (रावगाव) संतोषकुमार जाधव (कोर्टी )मनोहरभाऊ लांडगे (कोंढार चिंचोली )गजेंद्र पोळ (शेटफळ )अक्षय घाडगे (तरडगाव) नितीन तकीक (वांगी) हनुमंत वीर (पिंपळवाडी) तानाजी पवळ (शेलगाव) सविता कांबळे (करमाळा) बिबीशन नागणे (केम) शुभम वेदपाठक( साडे) यांच्या निवडी झाल्या आहेत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा