Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

कु . आनंदी साठे हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पोथरे केंद्रशाळेत शालेय साहित्याचे वाटप.

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पोथरे येथे कु .आनंदी साठे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा अजित साठे यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.मनीषा साठे या प्रत्येक वर्षी  वाढदिवसाचे औचित्य साधून अन्नदान, दिव्यांगांना साहित्य वाटप, जनावरांना चारा वाटप असे विविध उपक्रम राबवत असतात. जिल्हा परिषद शाळेचे महत्व ओळखून


यापूर्वी देखील त्यांनी पोथरे शाळेला मोठा ढोल भेट दिलेला आहे.आज आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मनीषा साठे, संजीवनी साठे, अभिज्ञा साठे, आनंदी साठे व मिताली इवरे उपस्थित होत्या




याप्रसंगी बोलताना मनीषा साठे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले ज्ञान संपादन करून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहावे व आपल्या आईवडिलांचे, गुरुजनांचे आणि गावाचे नाव उज्वल करावे आणि त्याचबरोबर शालेय जीवनात किंवा पुढे समाजात वावरत असताना आपण जरी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या  संपर्कात येत असलो तरीही आपण फक्त त्यातील चांगल्या गुणांचाच  स्विकार करावा आणि आपली वाटचाल आदर्शवत ठेवून देशाचं एक आदर्श नागरिक घडावं असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत आणि त्या टिकल्या पाहिजेत नाहीतर पुढे गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून  वंचित राहतील यासाठी वेळीच काळाची गरज ओळखून प्रत्येक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्चांना फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेमधे आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा अशी कळकळीची विनंती आणि अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली .

पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आज या विधायक उपक्रमाचे आयोजन केलेबद्दल शाळेच्या वतीने मनीषा साठे व संजीवनी साठे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच बर्थडे गर्ल आनंदी साठे हिला शाळेतील पहिलीच्या मुलींतर्फे भेटवस्तू देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकूर शेख यांनी केले तर शेवटी लहू जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाबिरा मुलाणी व राजश्री सावंत यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा