Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

*कार्यकारी अभियंता शिवमती सविता दळवी यांचा मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने सन्मान*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथील नूतन कार्यकारी अभियंता शिवमती सविता दळवी मॅडम साहेब यांचा मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांचे वतीने सन्मान अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सुनीता पाटील या नुकत्याच सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या जागी सविता दळवी मॅडम यांची कार्यकारी अभियंता या पदावर ती च नियुक्ती झाली त्याबद्दल मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांचे वतीने दळवी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला    


  सत्कार करताना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा तसेच विविध पुस्तके देऊन मॅडम यांचा सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे इंजिनिअर उत्तमराव माने शिवाजीराव लोंढे बाळासाहेब पवार ठेकेदार दिलीप सांगडे सेवा संघाचे जेष्ठ सदस्य सिद्धेश्वर नाग टिळक भाऊसाहेब जिजाऊ ब्रिगेडच्या अक्काताई माने मनोरमा लावून सुवर्णा घोरपडे हेमलता सांगळे तसेच कल्पना चव्हाण इत्यादी उपस्थित होते दळवी मॅडम यांची सेवा पुणे मुंबई येथे झालेली आहे या ठिकाणी यांनी अगोदर त्यांनी साखर संकुल येथे कार्यकारी अभियंता या पदावर काम केले आहे             

                                             

          मराठा सेवा संघाच्या वतीने आलेल्या सर्व नूतन अधिकारी यांचा सन्मान केला जातो त्याप्रमाणे आज देखील दळवी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला 

जिजाऊ ब्रिगेड तसेच 32 कक्ष यांचे चाललेले कार्य याची सविस्तर माहिती दळवी मॅडम यांनी सदर प्रसंगी घेतली आणि मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांना त्यांच्या सामाजिक कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा