*श्रीपूर-बी.टी.शिवशरण*
जांबूड सेक्शन चौदा येथील मागासवर्गीय कुटुंब असलेले राजू विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या संपूर्ण परिवारासह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा कार्यालय समोर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या बाबत त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी मागासवर्गीय कुटुंबातील अल्पभूधारक शेतकरी असून माझी जमीन बोरगाव गट नंबर 494/1.500/1.501/1अ या गटामध्ये असून माझे या क्षेत्रातील कापणीस आलेले एक एकर दोन गुंठे केळी पिक असून दिनांक 17/5/2026रोजी शेती महामंडळाच्या श्रीपूर ऊस मळ्यातील ब्लाक नंबर 14मधील वाळलेले नेपिअर गवत संयुक्त शेती धारक साई बायो एनर्जी प्रा लि हैदराबाद यांनी पेटवले व त्या वेळी माझे तेथे कापणीस आलेले 42गुंठे केळी पिक जाळून माझं मोठे नुकसान झाले आहे या क्षेत्रातील ठिबक पुर्णपणे जळालेले आहे माझे केळी पिकाचे सुमारे 9.00000अक्षरी रुपये नऊ लाख नुकसान झाले आहे या संदर्भात कंपनी कडे समक्ष भेटून नुकसानभरपाई संदर्भात चर्चा केली त्याचा पाठपुरावा केला सुरुवातीला कंपनी चे अधिकारी यांनी सहकार्य करु भरपाई देऊ असे तोंडी म्हणत होती त्यानंतर कंपनीने आम्हाला गहाळ पाडून वेळ मारुन नेली आता कंपनी नुकसान भरपाई देण्यास पुर्णपणे टाळाटाळ करीत आहे व शेवटच्या टप्प्यात आता आम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही असा पवित्रा घेतला आहे आमच्या कुटुंबावर मोठा घोर अन्याय झाला आहे या बाबत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा स्थावर व्यवस्थापक सौ सुनिता अस्वरे यांना समक्ष भेटून लेखी तक्रार केली त्यांनीही मी संबंधित कंपनी व्यवस्थापन यांच्याशी बोलून तुम्हाला सहकार्य करायला बोलते असे गेल्या दोन महिन्यांत चार वेळा सांगितले आता स्थावर व्यवस्थापक याही म्हणत आहेत कंपनी नुकसान भरपाई देण्यास नकार देत आहे या सर्व पार्श्वभूमीवर एका दलित अल्पभूधारक शेतकरी असलेल्या कुटुंबावर मोठा अन्याय सदर कंपनी व राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा स्थावर व्यवस्थापक हे करत आहेत म्हणून हे पिडीत कुटुंबाने येत्या पंधरा ऑगस्ट रोजी श्रीपूर येथील राज्य शेती महामंडळ कार्यालय समोर कुटुंबा समवेत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात विजय विठ्ठल भोसले यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील तहसीलदार माळशिरस प्रांत अधिकारी अकलूज विभाग सोलापूर जिल्हा अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री दत्ता भरणे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे
स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा
मा राजाभाऊ सरवदे प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर
मिलिंद सरतापे माळशिरस तालुका अध्यक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वेळापूर
माजी आमदार रामभाऊ सातपुते
अध्यक्ष -श्रीपूर पत्रकार संघ
पोलिस निरीक्षक- अकलूज पोलिस स्टेशन अकलूज
इत्यादींना साखळी उपोषण करण्याचें निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती तक्रारदार विजय विठ्ठल भोसले यांनी दिली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा