*मुख्यसंपादक*
*हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो.9730867448*
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील आदर्श गुरुवर्य कै. बाबुराव महादेव दिलपाक (गुरुजी) यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनी त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने अर्धकृती पुतळा (पवित्र शिल्प) चे अनावरण करण्यात आले. गुरुजी १४ वर्षाचे असताना
महापरिनिर्वाण झाल्यानंतर ते अंत्यविधीसाठी गेलेले कुंभारीतील एकमेव व्यक्ती होते.
त्यांनी शिक्षक म्हणून तुळजापूर मंगरुळ व नळदुर्ग भागात सेवा केली होती. यावेळी पूज्य भन्ते डॉ. बी. सारीपुत्त यांनी बुद्ध वंदना घेतली.
गुरुवर्य बाबुराव गुरुजी यांच्या बद्दल त्यांच्या शिष्यांना (विद्यार्थ्यांना ) आदर युक्त धबधबा होता त्यांच्या या दबदब्या मुळेच अनेक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होऊन उंच भरारी घेत आहेत त्यामुळे 'असे गुरुवर्य होणे नाही'
गुरुवर्य कैलासवासी बाबुराव एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरासमोरून जात असताना तो विद्यार्थी घरासमोर खेळत असेल तर तो विद्यार्थी त्यांना पाहून त्यांच्या दरारा मुळे घरी जाऊन लपून बसत होते.
गुरुवर्य कै.बाबुराव दिलपाक गुरुजी यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी
नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनावणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य भन्ते डॉ. बी. सारीपुत्तजेष्ठ साहित्यिक तथा निवृत्त शिक्षण अधिकारी योगीराज वाघमारे, सोलापूर येथील बौद्धाचार्या नंदाताई काटे, माजी पोलीस
अधिकारी अधिकारी अशोक दिलपाक, वन परिक्षेत्र यशपाल दिलपाक, पोलीस पाटील विठ्ठल वडणे, संतोष वडणे आदींच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गुरुवर्य बाबुराव महादेव दिलपाक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोनावणे, साहित्यिक वाघमारे, अशोक दिलपाक, भगवान दिलपाक, मेसूबाई गायकवाड यांनी गुरुजींच्या कार्यावर प्रकाश टाकीत उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. या धम्म देसना, सरणतंय गाथा भन्ते सारीपुत्त यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्या नंदाताई काटे यांनी केले. या प्रसंगी स्वामी गुरुजी, नागनाथ वडणे गुरुजी तसेच गुरुजींच्या संपर्कातील निवृत्त शिक्षक, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*"टाइम्स 45 न्यूज मराठी" चे 'संपादक --हुसेन मुलाणी' यांच्या वतीने विनम्र अभिवादन*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा