*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज सकाळी दहा वाजता करमाळा नगरीत आगमन होताच करमाळा कराच्या वतीने प्रथम नागरिक या नगराध्यक्ष सौ मोहिनी सावंत तसेच शिल्पा ठोकडे यांनी सदर पालखीचे जोरदार स्वागत केले
यावेळी करमाळा नगरीत पालखीचे आगमन होताच करमाळ्यातील अनेक नागरिक व महिलांनी घरासमोर रांगोळी घालत पालखीचे स्वागत केले याशिवाय करमाळा शहरातील राशीन पेठ तरुण मंडळ या मंडळांनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोफत अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता एकंदर पाहता त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे करमाळा करांनी भक्तिमय वातावरणात स्वागत करून पालखीला अखेर निरोप दिला यावेळी पालखीचे आबाल वृद्धासहित सर्वच करमाळा शहरातील महिला व नागरिकांनी पालखीचे यथोचित दर्शन घेतले एकंदर पाहता करमाळा नगरी भक्तीमय वातावरणात चिंब भिजून गेली संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी चे स्वागत करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच नगरसेवक संजय सावंत अमोल परदेशी सचिन घोलप आदी मान्यवर नगरसेवकांनी घेतले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा