Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

*अकलूज येथील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुण्यतिथी साजरी.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त  श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उपस्थितांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.


            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयशीला मनोहर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शाहिरीचे बादशहा,दलित शोषितांच्या आवाजाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी शिंदे हिने आपल्या मनोगतातून माझी लेखणी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल आहे असे अण्णाभाऊ साठे म्हणत असल्याचे सांगितले.कु.प्राजक्ता बोडरे या विद्यार्थिनींने आपल्या मनोगतात "जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव" या अण्णाभाऊ साठे यांच्या  कवितेचे वाचन केले.कु.कृतिका सोनवणे या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात 'थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा' या उक्तीवर प्रकाश टाकला.कु.रजिया शेख या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडलेत.अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणत,मी जे काही लिहितो ते बाबासाहेबांच्या विचारांची शाही वापरून लिहितो.तसेच "माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहयली" या सुप्रसिद्ध गाण्यावरही प्रकाश टाकण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भारती भोसले  या होत्या. 


        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सांची गायकवाड व कु.ऐमन तांबोळी यांनी केले.आभार प्रदर्शन कु.ऋतुजा लांडे हिने केले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित घाडगे, डॉ.जयशीला मनोहर,डॉ.ऋषि गजभिये,डॉ.राजश्री निंभोरकर, डॉ.छाया भिसे,नाना साठे,दीपक शिंदे,रमजान शेख व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा