*अकलूज प्रतिनिधी*
केदार- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे ३३ हजार भाकरी व १४० किलो बेसनाचे पिठले,ठेचा, लोणचे, कांदा अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात आले.यासाठी संस्थेच्या १० शाखेतून १० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.
सराटी अकलूज महामार्गावर या अन्नदानाच्या वाटपाचा प्रारंभ संस्थेचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला.यावेळी सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, यांच्यासह विविध शाखेचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि.२० जुलै रोजी अकलूज(जि.सोलापूर) येथे आगमन होत आहे.पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि.पूणे) येथे असतो. सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असल्याने व अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. त्या वैष्णवांनाही अन्नदान व्हावे या हेतूने संस्थेचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी सन २०१५ पासून संस्थेच्या वतीने अन्नदानाला सुरुवात केली. अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील,नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. अन्नदान वाटपाचे हे १२ वे वर्ष आहे.
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील वैष्णवासाठी अकलूज सराटी महामार्गावर झालेल्या या अन्नदानात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर,महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ८ हजार विद्यार्थी अन्नदानात सहभागी झाले.येथे २४ हजार भाकरी, ७५ कीलो बेसन पिठलं, ठेचा,लोणचं,कांदा असा ग्रामीण भोजनाचा सहभाग आहे.
तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर यांच्या वतीने मांडवे (ओढा) विसावा येथे दि.२० जूलै रोजी ५ हजार भाकरी व ३५ किलो बेसन,ठेचा,लोणचे असे अन्नदान होत असून यामध्ये सुमारे १ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत.वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय,प्राथमिक,माध्यमिक व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर यांच्या वतीने दि.२१ जूलै रोजी ४ हजार भाकरी,३० किलो बेसन, ठेचा,लोणचं असे अन्नदान होत असून या मध्ये १ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा