Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ जुलै, २०२६

कर्मयोगी कारखान्याचा सर्व कर्मचाऱ्यांनी कारखाना गेट समोर प्रलंबित मागण्यासाठी केले ठिय्या आंदोलन.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा

मंगळवार,७ जुलै २६ 

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक

मो. 9922419159


कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. सहयोग ओंकार शुगर ॲन्ड डिस्टीलरी पॉवर प्रा. लि. बिजवडी, कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कारखाना गेट समोर आज एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून आपल्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून इंदापूरचे तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक कार्यालयास निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.



कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. महात्मा फुलेनगर ( बिजवडी ) ता. इंदापूर, जि. पुणे चे सर्व कर्मचाऱ्यांनी यापूर्वी कर्मचा-यांचे प्रलंबिल प्रश्नाबाबत दि.

 दि. २० जुलै २०२१,

 दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजीचे एल फॉर्म नोटीस, दि. १५ डिसेंबर २०२५, दि. २९ मे २०२६ चे पत्र तसेच

 दि. ४ जून २०२६ चे पत्राव्दारे आमच्या विविध प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र त्याची अद्याप योग्य दखल घेतली गेली नाही. 

सदर प्रश्नांची अद्याप  सोडवणुक झाली नाही. याबाबत आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी आपणास समक्ष भेटून तसेच लेखी पत्र देवून आमचे प्रश्न सोडवून मार्गी लावणेबाबत विनंती केली आहे. परंतु आपणाकडून आमच्या मागण्या व प्रश्न सोडविले गेले नाहीत, थकीत देय अदा करण्यात आलेले नाहीत. यामुळे आम्हा सर्व कर्मचारी यांचेवर खूप आर्थिक संकट येत असून, प्रापंचिक समस्या येत आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या समस्या सोडवण्यासाठी व कारखाना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी कारखाना गेट समोर दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले आहे.

आम्हा कामगारांचे प्रलंबित सर्व प्रकारचे थकीत येणे न मिळाल्यास यापुढे सर्व कामगार तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, त्यामुळे होणा-या सर्व प्रकारची जबाबदारी कारखाना व्यवस्थापनाची राहील असा इशारा यानिमित्त देण्यात आला आहे.

दरम्यान आंदोलनाची दखल घेऊन कारखाना व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसात मार्ग काढला जाईल, त्यासाठी एक समिती गठित करून प्राधान्याने प्रश्न सोडविले जातील असे तोंडी आश्वासन दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा