इंदापूर, डॉ. संदेश शहा
शनिवार, १८ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले।
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले।
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहु दे।
पाडूंरगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहु दे।।
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी येथील इंदापूर कडे प्रस्थान केल्यानंतर सोहळ्याचे सोनमाथा येथे दुग्ध पंढरी सोनाई दूध संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सोनाई परिवार व दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, कार्यकारी संचालक विष्णुकुमार माने, विश्वस्त प्रवीण माने, अतुल माने, किशोर माने यांच्या हस्ते पालखी विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर गोखळी तरंगवाडी ग्रामपंचायत व येथील भाविकांचा पाहुणचार स्वीकारून सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर नगरीत शनिवारी १८ जूलै रोजी पावणेबारा वाजता लाखो वैष्णवांसह पोहोचला. जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर नगरीत झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात व तुकाराम तुकाराम यांच्या जयघोषात शहरातील श्रीराम वेस नाका, अकलुज बारामती चौक येथे पालखी येताच नगरपरिषदेच्या वतीने पालखीला तोफांची सलामी देण्यात आली. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, भाजपा नेते प्रदिप गारटकर, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, गटनेता शकील सय्यद, विरोधी पक्ष नेता अनिल पवार, माजी गटनेता कैलास कदम, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, विठ्ठलराव ननवरे, श्रीधर बाब्रस यांनी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे, सोहळा प्रमुख विक्रम मोरे, लक्ष्मण मोरे, उमेश मोरे, विश्वस्त गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे यांचे स्वागत केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. नगराध्यक्ष भरत शहा, भाजप नेते प्रदीप गारटकर, माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या सह मान्यवरांनी पालखी सोहळ्यातील पादुकांची सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या शामियाना मध्ये आरती केली.
यावेळी बारामती प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक विलास नाळे, माऊली चवरे, बाळासाहेब मोरे, धरमचंद लोढा, बाळासाहेब सरवदे, किरण गानबोटे, उमेश मखरे, सौ. सुनिता वाघ, सुनीता नलवडे, वंदना शिंदे, दीप्ती राऊत, मयुरी उंबरे, शोभा जावीर, शकिला बागवान, शीतल शेटे पाटील, सदफ बागवान, अक्षय सूर्यवंशी, सागर अरगडे, अक्षय मखरे, शुभम पवार, सुधाकर ढगे, पोपट शिंदे, रजिया शेख, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, गणेश राऊत, माऊली नाचण, आरशाद सय्यद, हमीद आतार, महादेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यानंतर वारकरी, नागरिक, महिलांनी फुगडी खेळाचा आनंद लुटला तर टाळकरी, विणेकरी व पखवाज वादक यांनी उंच मनोरा रचत रिंगण सोहळा यशस्वी पार पाडला. त्यानंतर पालखी सोहळा इंदापूर शहरातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात विसावला. यावर्षी एकच मुक्काम असल्याने रात्री किर्तन आणि जागर यामुळे पालखी तळ दुमदुमुन गेला. शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, नागरिक यांचे वतीने वारकऱ्यांना मसाला दुध, चहा, फराळ,नाष्टा, फळे, अन्नदान करण्यात आले. सूत्रसंचलन संतोष नरुटे, कैलास कदम यांनी केले.
यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्या वतीने रिंगण सोहळा पाहण्यासाठी गॅलरी उभी करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणे यंदा प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अमोल उन्हाळे यांनी काढलेली मूकबधिर विद्यार्थ्यांची दिंडी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
पालखी सोहळा रिंगण झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेत येत नसल्याने इंदापूरकर सोहळ्यावर नाराज आहेत. हा पालखी सोहळा रिंगणानंतर मुख्य बाजारपेठेतून श्री नारायणदास रामदास हायस्कूल प्रांगणात विसाव्यासाठी जावा. तेथे कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी हा सोहळा आयटीआय मैदानात मुक्कामासाठी न्यावा अशी मागणी इंदापूर शहरातील भाविकांनी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा