Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १८ जुलै, २०२६

​संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी गोखळी तरंगवाडी येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

शनिवार, १८ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९


जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) आणि इंदापूर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोखळी-तरंगवाडी ( ता. इंदापूर ) येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ हजारो वारकऱ्यांनी तसेच स्थानिक रुग्णांनी घेतला. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, त्यांना वैद्यकीय सल्ला व मोफत औषधोपचार देण्यात आले.



शिबिर शुभारंभ प्रसंगी इंदापूर 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. अभिजीत ठोंबरे म्हणाले, शरीरा सोबतच मनाच्या आरोग्यासाठी भक्तीमार्ग सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही डॉक्टर मानवी शरीरावर उपचार करतो, शरीराचे आजार बरे करतो. परंतु, आजच्या या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात मनाला खरी शांतता आणि आत्मिक आनंद देणारा मार्ग  म्हणजे 'भक्तीमार्ग' होय. हा भक्तीमार्ग जगात सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव असणाऱ्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करणे, म्हणजेच वारकऱ्यांच्या रूपातील साक्षात विठ्ठलाची सेवा करण्यासारखे आहे, अशी आमची धारणा आहे."


या शिबिरात डॉ. सागर दोशी, डॉ. अमोल रासकर, डॉ. ऋषिकेश गार्डे, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. शिवाजीराव खबाले, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. महेश रूपनवर, डॉ. अनिल शिर्के, डॉ. अनिल पेटकर, डॉ. सचिन बिचुकले, डॉ. रोहीदास थोरवे, डॉ. लक्ष्मण सपकळ, डॉ. उदय कुरुडकर, डॉ. शैलेश घोगरे, डॉ. रोहित कांडलकर, डॉ. जी. आर. बनकर, डॉ. मनोज शिंदे या

तज्ज्ञ डॉक्टरांनी अनमोल योगदान दिले. या वैद्यकीय पथकास

 शीतल बोरा यांनी सहकार्य केले.


 डॉ. अश्विनी ठोंबरे, डॉ. अनुजा दोशी, डॉ. कल्पना पाणबुडे, डॉ. कविता रूपनवर, डॉ. दीपाली तोरवे, डॉ. ज्योती नरुटे, डॉ. नुपूर कदम, डॉ. मनीषा बाबर, डॉ. आरती फडतरे, डॉ. सत्यवती घोगरे, डॉ. तेजश्री गार्डे, डॉ. दीप्ती मदने, डॉ. भारती कुरुडकर, डॉ. सुषमा सपकळ, डॉ. शुभांगी गार्डे या ​महिला वैद्यकीय पथकाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार  केले. ​हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे आणि आयएमएचे सचिव डॉ. अतुल वणवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

​हा सोहळा शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सुविधेसाठी स्थानिक पातळीवरील मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये:

​ विष्णुपंत मकर, माऊली वाघमोडे पाटील, लक्ष्मण हरणावळ सर ( संचालक व संस्थापक अध्यक्ष, गुरुकुल गोखळी ), प्रदीप पोळ ( पोलीस पाटील, गोखळी ) या मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा वरील स्थानिक मान्यवरांच्या हस्ते गोखळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

​या सर्व मान्यवरांच्या आणि डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे आरोग्य शिबिर अत्यंत यशस्वी झाले. डॉक्टरांच्या या तत्पर व आपुलकीच्या सेवेबद्दल हजारो वारकऱ्यांनी मनापासून समाधान व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा