पुणे, डॉ. संदेश शहा.
गुरुवार, दि. २ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी
मो. ९९२२४१९१५९
सन १९४५ पासून गेली ८० वर्ष सर्वधर्मीय हजारो वधू वरांचे सहजीवन फुलविणाऱ्या अक्षदा विवाह आणि पुनर्विवाह संस्थेचे संचालक, ज्येष्ठ निराधार नागरिकांशी समरस होवून कार्य करणारे, शेकडो एच आय व्ही बाधीत वधू वरांचे लग्न जुळविणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र भवाळकर यांची जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन च्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
जायंट्स वेलफेअर फौंडेशन च्या पुणे मेन या शाखेचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. फौंडेशन च्या सेंट्रल कमिटी चे पदाधिकारी डॉ. अनिल माळी, शारदा बेलपत्रे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. राजेंद्र भवाळकर यांच्या कडे सुपूर्द केली. यावेळी सुरेश धनावडे, प्रफुल्ल आहेरकर, छाया भगत यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली.
यावेळी डॉ. भवाळकर यांचा डॉ. अनिल माळी यांच्या हस्ते फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ. राजेंद्र भवाळकर म्हणाले, महिलांचे मानसिक आरोग्य,एच आय व्ही बाधीत वधू वरांचे विवाह जुळवण्यासाठी परिचय मेळावा, कौटुंबिक समस्या निवारणासाठी समुपदेशन केंद्र, निरनिराळ्या आरोग्य शिबिराचे आयोजन, संगणक साक्षरता, वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांच्या सहली, त्यांच्या करमणूकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देवू. जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी शेवटी स्पष्ट केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा