Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

माळशिरस येथे हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती.* माळशिरसमध्ये पर्यावरण संवर्धनाचाY प्रेरणादायी उपक्रम.

 *अकलूज प्रतिनिधी* 

  *केदार लोहकरे*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


जीवन सहारा परिवार,जैन सोशल ग्रुप अकलूज,माळशिरस पोलीस स्टेशन आणि से ट्रीज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने "हरित वारी" या पर्यावरण पूरक उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

         हा उपक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तसेच माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे,श्री.रोकडे व श्री. दुबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

        पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वड,पिंपळ,उंबर,कडुनिंब, चिंच,आवळा यांसारख्या देशी, आयुर्वेदिक व अधिक प्राणवायू देणाऱ्या वृक्षांच्या विविध बियांचे संकलन करून त्यापासून एक लाखांहून अधिक सीडबॉल तयार करण्यात आले.या उपक्रमात माळशिरस येथील सहा शाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.त्यामध्ये गोपाळराव देव प्रशाला,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशाला,कन्या प्रशाला माळशिरस,माळशिरस प्रशाला,मारुती नाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय आणि आप्पासाहेब देशमुख विद्यालय या शाळांचा समावेश होता.विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत मोठ्या उत्साहाने सीडबॉल तयार केले.

             या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन सोशल ग्रुपचे व जीवन सहारा परिवारचे सीए अमित दोशी,प्रितेश गांधी,पियुष दोशी,गौरव फडे,अमोल वैद्य,सुरेंद्र दोभाडा,मयूर दोशी,सतीश दोशी, डॉ.निलेश फडे,अल्पेश दोशी, बाहुबली गांधी तसेच से ट्रीझ प्रोजेक्ट मॅनेजर दादा वाघमोडे, कृष्णा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

          माळशिरस पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदवला आणि पर्यावरण संवर्धनाच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील विविध संस्था,पोलीस प्रशासन,विद्यार्थी आणि नागरिक यांना एकत्र आणणारा हा उपक्रम भविष्यात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा