Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ इंदापूर मध्ये छात्र भारती, नागरी संघर्ष समिती तसेच विद्यार्थी झाले आक्रमक, सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळात इंदापूर नगरपरिषदेसमोर होणार लाक्षणिक उपोषण.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



देशामध्ये नीट जेईई व

टीएटी चा फुटलेला पेपर याच्या विरोधात वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, पर्यावरणवादी, संशोधक, जेष्ठ

समाजसेवक सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषणाचा आज २१ वा दिवस आहे. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सदर पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी त्यांची ठाम मागणी असून त्या मागणीसाठी तसेच केंद्र सरकारने उपोषणाची दखल घेऊन श्री वांगचूक यांचे उपोषण थांबवावे यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती तसेच विद्यार्थी आक्रमक झाले. त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी गंगेच्या स्वच्छतेसाठी गंगापुत्र आगरवाल यांनी १११ दिवस उपोषण केले होते परंतु सरकारने त्याची दखल न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी परिस्थिती वांगचुक यांच्या बाबतीत घडू नये अशी देशवासीयांची भावना आहे. यानिमित्त झालेल्या चर्चासत्रात



विद्यार्थ्यांसाठी लढणारा हा समाजसेवक भविष्यकाळात या देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्याची दखल घेऊन त्यांचे उपोषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी छात्र भारती व संघर्ष समितीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली.  यावेळी अनेक

विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. भविष्य काळात परीक्षाच बंद करा, कशासाठी परिक्षेचा फार्स करता अशी तीव्र प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. पेपर फूटल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी वेळ भविष्यात कोणावरही येऊ नये, म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण, महादेव सोमवंशी, विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल काळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे, जय नर्सिंग इन्स्टिट्यूटचे जयवंत नायकुडे, अमोल जावळे, संकल्प मानव ट्रस्टचे संतोष जामदार, छात्र भारतीचे सोनु सय्यद, गजानन पवार, बाबा पवार, भारत बोराटे, काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका अध्यक्ष निवास शेळके, हनुमंत बोंगाणे, अशोक अनपट यांच्यासह हजारो पालक व विद्यार्थी उपस्थित होते.  सोनम वांगचुक यांच्या न्याय मागण्याची दखल सरकारने घ्यावी यासाठी सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळात इंदापूर नगरपरिषदेसमोर  लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, सर्वांनी या उपोषणास पाठिंबा द्यावा असे आवाहन छात्र भारती व संघर्ष समितीच्या वतीने

 करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा