Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

शहा ग्लोबल स्कूलमध्ये भक्तिरसाने नटलेला आषाढी पालखी सोहळा उत्साहात संपन्न.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



आषाढी एकादशीचे औचित्य साधत इंदापूर येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून, पारंपरिक वेशभूषेत आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात, मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे व्यवस्थापन सदस्य मुकुंद शहा,  भरत शहा, अंगद शहा, सौ. रुचिरा शहा तसेच मुख्याध्यापिका सौ. वैश्णवी देशपांडे यांच्या शुभहस्ते पालखीचे विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमे समोर प्रार्थना करून सर्वांच्या सुख समृद्धी साठी मंगलकामना व्यक्त केल्या. 

शाळेतील बालवारकऱ्यांची  आकर्षक पालखी मिरवणुक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, भगवे पताके आणि "रामकृष्ण हरी", "ज्ञानोबा-तुकाराम" या नामघोषात संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या निरागस भक्तिभावाने आणि उत्साहाने उपस्थित पालक, शिक्षक व मान्यवर भारावून गेले.

पालखी पूजनानंतर विद्यार्थ्यांनी विविध भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी निरागस अभिनयातून आणि सुंदर सादरीकरणातून विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सौ. विद्या कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले आकर्षक विठ्ठल नृत्य विशेष दाद मिळवून गेले. सौ. विद्या बडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विठ्ठल भक्तीपर भजनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, वारकरी परंपरा आणि आषाढी वारी याविषयीची माहितीही सादर केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि जिज्ञासा निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी वारी परंपरेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाराष्ट्राच्या संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारीबाबतचे ज्ञान आनंददायी पद्धतीने आत्मसात केले.

समारोपप्रसंगी व्यवस्थापन सदस्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संतांच्या विचारांचा अंगीकार, भक्ती, संस्कार, शिस्त, परस्पर सहकार्य आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच भारतीय संस्कृती आणि परंपरेविषयी प्रेम व आदर निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक वेशभूषा, देखणी सजावट आणि भक्तिमय वातावरणा मुळे संपूर्ण शाळा परिसराने पंढरीचे रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळाले. उत्साह, भक्ती आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ घडविणारा हा पालखी सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ. विद्या बडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा