Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जुलै, २०२६

*आषाढी वारी २०२६ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी आळंदी कडे न येण्याचे आळंदी नगरपरिषद चे आवाहन* *आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही पुल पाण्याखाली गेले आहेत*

 *करमाळा तालुका -प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो;-9850686360*


आळंदी कडे येणाऱ्या चारही पुल पाण्याखाली गेल्याने आळंदी नगरपरिषदेने प्रसिद्धी पत्रकार द्वारे जारी जाहीर सूचना जारी केलीआहे.

आषाढी वारी २०२६ - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा दिनांक ६/७/२०२६० रोजी असुन 


इंद्रायणी नदीला *मोठ्या प्रमाणात पूर* आला आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत*. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही

     त्यामुळे वारकरी आणि भाविकांसाठी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आवाहन केले आहे की

जे वारकरी/भाविक आळंदीच्या दिशेने निघाले आहेत त्यांनी जिथे आहेत तिथेच सुरक्षित थांबावे



आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. अशी प्रशासनाच्या वतीने  सूचना करण्यात आली आहे

प्रशासन, पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे भाविक भक्तांनी काटेकोरपणे पालन* करावे

अफवांवर विश्वास ठेवू नये*

नदीपात्र, घाट परिसर आणि बंद केलेल्या पुलांकडे जाणे टाळावे

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती. करण्यात आली आहे

थोडक्यात: पुरामुळे आळंदीचे  ४ ही पूल बंद झाल्याने आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना तूर्तास आळंदीकडे न येण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा