Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

*अकलूजमधील किडझी स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त बाळगोपाळांचा रंगला दिंडी पालखी पारंपरिक पालखी सोहळा.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त किडझी अकलूज येथे पारंपरिक पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत दिंडी, पालखी व विठ्ठल नामाच्या जयघोषात व भक्तीभावाने किडझी स्कूलचा परिसर हरीनामाच्या गजरात दुमदुम गेला होता.


          या कार्यक्रमाची सुरुवात स्कूलच्या व्यवस्थापक सौ. पल्लवी गायकवाड व प्राचार्या सौ.सुषमा देशपांडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन,आरती व पालखी पूजन करून करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ, चिपळ्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात शाळेच्या परिसरात दिंडी काढत वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव घेतला.


           या कार्यक्रमाचे आयोजन धनशैल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनिष धनंजय गायकवाड यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा तसेच भारतीय संस्कृतीतील भक्ती,समता आणि सेवाभाव यांची ओळख करून देण्यात आली.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा