Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १९ जुलै, २०२६

*भक्तीच्या वाटेवर, वारकऱ्यांची सेवा हेच आमचे कर्तव्य!......माजी आमदार संजय मामा शिंदे*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


भक्तीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा हेच आमचे प्रमुख कर्तव्य असल्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,करमाळा शहर व तालुका आयोजित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कर्मयोगी नेतृत्वाचे प्रतीक स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती दिवसानिमित्त आषाढी वारीला जाणारे वारकरी यांना मोफत नाष्टा, चहापाणी व प्राथमिक उपचार केंद्र(आरोग्य तपासणी)या स्टॉलचे उद्घघाटन स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते पुजन करुन करण्यात आले.श


यावेळी ता.पं.समितीचे उपसभापती मा.ॲड.अजित विघ्ने साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा ता.पं.समितीचे सदस्य मा.भरतभाऊ आवताडे,जेष्ठ पत्रकार मा.विवेक आण्णा येवले,कंदर गावचे जेष्ठ नेते मा.नानासाहेब लोकरे,जि.प.सदस्य,मा.प्रशांत पाटील, माजी नगरसेवक मा.प्रविण जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष मा.आशपाक जमादार,म.न.से.चे तालुकाध्यक्ष मा.नानासाहेब मोरे,लेबर फेडरेशनचे संचालक मा.मानसिंग खंडागळे,मा.पै.उमेश इंगळे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मा.सचिन काळे, युवक नेते मा.अजिंक्य पाटील,देवळाली गावचे युवा नेते अभी पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अभिषेक आव्हाड,साडे गावचे सरपंच मा.मयुर पाटील,पोथरे गावचे युवक नेते मा.शहाजी झिंजाडे यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा