Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२६

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा ३७९० रुग्णांनी घेतला लाभ, गरीब व गरजू लोकांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा, येत्या दोन वर्षात इंदापूरचा चेहरामोहरा बदलणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

सोमवार,२७ जुलै २६

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



मानवी जीवनात आरोग्य महत्वाचे असून  आरोग्य शिबिराव्दारे गरजू व गरीब लोकांची सेवा करण्याचा नगराध्यक्ष भरत शहा व सहकाऱ्यांचा उपक्रम स्तुत्य आहे. गरिबांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होय असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.


राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त श्री नारायणदास रामदास शहा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, माजी सभापती दत्तात्रय फडतरे, विलासराव माने, हणमंतराव वाबळे, जेष्ठ संचालक मधुकर भरणे, प्रतापराव पाटील, वसंत मोहोळकर, कांतीलाल झगडे, अतुल झगडे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, हनुमंत कांबळे, सुनील अरगडे, गुरुकुल विद्या मंदिरचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ, सचिन सपकळ, डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा, डॉ. श्रेणिक शहा, इंदापूर आयएमए चे अध्यक्ष डॉ. अभिजीत ठोंबरे, डॉ. अनिल शिर्के, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. सागर दोशी, डॉ. सुहास शेळके, डॉ. उदय कुरुडकर, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्वराज हॉस्पिटल तसेच इतर डॉक्टरांनी एकूण ३७९० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले.


मंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या विकासात स्वर्गीय शंकरराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप, गणपतराव पाटील, बाबासाहेब पाटील यांच्याबरोबरच गोकुळदास शहा यांनी देखील भरीव योगदान दिले आहे. त्याबरोबरच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे आम्हा, अपना सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांची स्मृती चिरंतन राहण्यासाठी नगराध्यक्ष भरत शहा यांनी हा कौतुकास्पद विधायक उपक्रम राबविला आहे. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. येत्या दोन वर्षात इंदापूरचा चेहरामोहरा बदलला जाईल मात्र इंदापूर शहराची नाहक बदनामी करू नका असे आवाहन त्यांनी केले.

नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो. इथून पुढे देखील विधायक उपक्रमास सर्वतोपरी प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविक गटनेते शकील सय्यद यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय सूर्यवंशी यांनी केले.

शिबिराची वैशिष्ट्ये :

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आजारी असताना देखील ते इंजेक्शन घेऊन महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिले.

शहा परिवाराने तन, मन आणि धन अर्पून शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडली.

श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगराध्यक्ष भरत शहा, सौ. वैशाली भरत शहा, अंगद शहा, सौ. रुचिरा अंगद शहा, सौ. सायली संजय शहा यांनी  शिबिरामध्ये स्वयंसेवकांची भूमिका बजावली.

इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती चांगली असल्याने अजित पवार यांचे इंदापूरच्या विकासावर खूप लक्ष होते. भरत शहा यांनी भीमा नदीवर करमाळा व इंदापूर तालुका जोडण्यासाठी पुलाची मागणी अजित पवार यांच्या कडे केली होती. त्याची दखल घेऊन अजित पवार यांनी चार तासातच या पुलाची मागणी मान्य करून या पुलासाठी पावणेचारशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठ त्यांच्या इंदापूर भेटीची  छायाचित्रे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. 

शिबिरातील आजारांच्या वर्गवारी नुसार ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांची यादी करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश महाजन, नगरसेवक शुभम पवार, उमेश मखरे, अनिकेत वाघ, अरशाद सय्यद, प्रशांत उंबरे, फिरोज पठाण, मनोज राजगुरू, अख्तर मोमीन, अमोलसिंह माने, अशोक मखरे, गणेश पाटील, किशोर बागल, सीमा कल्याणकर, ॲड आनंद केकाण, महेश निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा