*तुळजापूर -प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव - लोकशाहीर, कवी, कादंबरीकार व भटके-विमुक्त समाजाचे प्रेरणास्थान *साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे* यांची 106 वी जयंती आज दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली.
अखिल भटके विमुक्त जाती जमाती महासंघ, महाराष्ट्र राज्य* च्या वतीने तुळजापूर येथे आण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी महासंघाचे *महाराष्ट्र राज्य सचिव मा. तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन* आणि *मराठवाडा अध्यक्ष मा. शेंडगे साहेब* यांनी आण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ते म्हणाले, "आण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी आणि साहित्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. कष्टकरी, वंचित आणि भटके-विमुक्त समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. भटके-विमुक्त समाजाला न्याय आणि आरक्षण मिळवून देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
या कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आण्णाभाऊंच्या गीतांनी करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा