Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूज सेवा केंद्रांतर्गत दहा कोटी नशामुक्ती महाअभियान.*

 *अकलूज प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकलूज सेवा केंद्राच्या वतीने दहा कोटी नशामुक्ती महाअभियानांतर्गत श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूल खंडाळी येथे नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            या कार्यक्रमात अकलूज सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शिवरात्री बहन यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयी सखोल मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या पदार्थांचे व्यसन तसेच मोबाईलचे व्यसन हे अत्यंत घातक आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोबल शक्तिशाली बनवणे आवश्यक आहे. 


*‘स्वपरिवर्तनापासून विश्वपरिवर्तन’*

या संकल्पनेतून आपण समाजातील व्यसनांचे दुष्परिणाम दूर करू शकतो.येणाऱ्या काळात प्रत्येकाने अधिक जागरूक होण्याची गरज आहे.आपले विचार हेच आपले मित्र आहेत. त्यामुळे त्यांना सकारात्मक आणि सशक्त बनवणे अत्यंत गरजेचे आहे.नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि आध्यात्मिकता यामुळे आपण नकारात्मक व व्यसनाधीन करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकतो.असेही त्यांनी सांगितले.

      या कार्यक्रमास मुख्याध्यापक लोंढे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुमारे ४०० विद्यार्थी उपस्थित होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती अभियानाला प्रतिसाद देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहण्याची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले.कार्यक्रमास ब्रह्माकुमारी परिवार,अकलूज यांचीही उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा