*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जेऊर येथील डॉ. प्राजक्ता मीरा आबासाहेब गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांजकडून आंतरविद्याशाखीय (शिक्षणशास्त्र) विषयातील Ph.D (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त झाली आहे.
डॉ. प्राजक्ता गोडसे यांनी कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी या संशोधन केंद्रातील डॉ.एम.व्ही.मते सरांचे मार्गदर्शन लाभले.
या संशोधन प्रवासात त्यांना वडील श्री.आबासाहेब गोडसे व आई सौ.मीरा गोडसे यांचा बहुमोल व खंबीर पाठिंबा लाभला तसेच त्यांचे पती श्री.तुकाराम नवत्रे-पाटील व चि. श्रीहान यांच्या सहकार्यामुळे संशोधनाचे काम सहज करता आले.
डॉ. प्राजक्ता गोडसे सध्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिकशिक्षण विभागात यशवंतराव चव्हाण माध्यमिक शिक्षिका असून त्यांचे शिक्षण डी.एड.,बी.एड, एम.एड., डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट, डी.एस.एम, नेट सेट व पी.एच.डी झाले आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभाग घेतलेला असून त्यांचे अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा