Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

 *मुळशी --प्रतिनिधी*

*पप्पू.कंधारे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *मो:-9765455011*


मुळशी : मुळशी तालुक्याची ओळख आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी मुळशीतील नागरिकांनी पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मुळशीकरांना एकत्र येण्याचे जोरदार आवाहन केले आहे. “मुळशीकर म्हणून सर्वांनी एकजुटीने पुढे या आणि मुळशीची बदनामी थांबवा,” असा ठाम संदेश देत या संदर्भात एक लोकचळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


महाराष्ट्रात कुठेही कोणतीही घटना घडली की त्याची तुलना मुळशीशी केली जाते, ही बाब गंभीर असल्याचे नागरिकांनी नमूद केले. यापुढे कोणीही मुळशीचे नाव चुकीच्या संदर्भात वापरू नये, यासाठी जाहीर ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मुळशी तालुका हा वारकरी संप्रदायाने गौरवलेला, शेतकरी, महाराष्ट्र केसरी पैलवान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, तसेच प्रशासनातील तहसीलदार, पोलीस, डॉक्टर, वकील, अभियंते आणि गुणवंत विद्यार्थी घडवणारा आहे. उद्योजक, व्यवसायिक, माजी सैनिक यांची परंपरा लाभलेला हा लाल मातीचा, गडकिल्ल्यांनी आणि सह्याद्री पर्वतरांगांनी नटलेला ऐतिहासिक तालुका आहे. तसेच सेनापती बापट यांचा सत्याग्रह आणि मामासाहेब मोहोळ यांच्या कुस्तीची परंपरा मुळशीच्या इतिहासात विशेष स्थान राखते.

या उपक्रमाला पुणे शहरातील विविध गणपती मंडळे, देवी मंडळे आणि सेवा सोसायट्यांनी लेखी पाठिंबा दर्शवला असून, उपस्थित नागरिकांनीही जाहीर संमतीपत्र देत या चळवळीला समर्थन दिले आहे.

यावेळी मुळशीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी, टाळकरी तसेच उद्योजक आणि तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मुळशीची ओळख जपण्यासाठी आणि बदनामी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा