टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
शहाजीराव पाटील यांचे चिरंजीव असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग २० वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. काका शंकरराव पाटील यांच्या कार्यशैलीचा त्यांच्यावर पगडा राहिला आहे. त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असली तरी त्यांचे सर्वच पक्षाशी चांगले संबंध राहिले आहे. १९९५ ते २००९ अशा सलग चार पंचवार्षिक मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. संसदीय कार्यमंत्री तसेच सहकार व कृषी क्षेत्रातील अभ्यासू नेते म्हणून मानले जातात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पक्ष वाढीसाठी आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहे
हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात इंदापूर शहरातील अद्यावत बस स्थानक नगरपालिकेची नूतन इमारत बांधण्यासाठी व कृषी उत्पन्न बाजार समिती ची नवीन इमारत उभारणीच्या व विस्ताराची काम केले
इंदापूरातील बावडा गावात जन्मलेल्या हर्षवर्धन पाटील विद्यार्थीदशेपासूनच यांनी इंदापूरच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी माजी काँग्रेस खासदार आणि त्यांचे काका शंकरराव पाटील यांना राजकीय प्रवासात खंबीर साथ दिली. यानंतर त्यांनी १९८५ साली अपक्ष म्हणून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी सलग चारवेळा आमदार बनण्याची किमया साधली. २००९ साली त्यांनी काँग्रेसचा हात धरला आणि तिकीट मिळताच विधानसभेवर निवडूनही गेले.
राजकीय प्रवासाचे वेळी अपक्ष आमदार असूनही पाटील त्यांची काँग्रेस नेत्यांशी जवळचे संबंध राहिले आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. कृषी, जलसंधारण आणि फलोत्पादन राज्यमंत्री, पणन व रोजगार हमी योजना मंत्री, संसदीय कामकाज तसेच महिला व बालविकास अशा खात्यांची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. १९८५ ते २०१४ अशी त्यांची यशस्वी राजकीय कारकीर्द राहिली असली तरी २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना आपला बालेकिल्ला मात्र राखता आला नाही.
२०१४ च्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात अवघ्या ३११० मतांनी पराभव झाला. यानंतर पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवली पण यावेळीही त्यांनी पराभव पत्करावा लागला. हर्षवर्धन पाटील यांनी २०२४ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवली मात्र त्यामध्येही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले
फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे (नवी दिल्ली) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिन विरोध निवड झाली आहे हल्ली महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचेकाम करत आहेत





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा