Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

वांगी नं.२ येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषणस्थळी युवा नेते पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांनी दिली भेट...*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी


वांगी नं. २, ता.करमाळा येथील श्री दत्त बहुउद्देशीय संस्था संचलित श्री अवधूत विद्यालय,वांगी नं. २ येथील मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्या कथित बेकायदेशीर कामकाजा विरोधात ग्रामस्थ संभाजी मुळे,गणेश भानवसे,नितीन तकीक व दादा कांबळे यांनी दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर आमरण उपोषणास सुरुवात केली.


या उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर युवा नेते पृथ्वीराज (भैय्या) पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या व संबंधित विषयाची माहिती जाणून घेतली.


शाळेतील कथित बेकायदेशीर कामकाजाबाबत संबंधित प्रशासनाने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे.या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा