इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.992241915
शहा ग्लोबल स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या वातावरणात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासाचा प्रवास विविध क्षेत्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केला.
कार्यक्रमात शेती, अर्थव्यवस्था, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने केलेल्या प्रगतीचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून विकसित आणि आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुंदररीत्या उलगडली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे होते.
श्रीराज भरणे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात आजच्या शिक्षणव्यवस्थेतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा ऊहापोह करत उपलब्ध साधनांचा शिक्षण क्षेत्रात योग्य आणि प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी रोजगारनिर्मिती आणि समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याविषयीही विचार मांडले.
व्यवस्थापन समितीचे सदस्य अंगद शहा यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व स्पष्ट करताना “स्वातंत्र्य म्हणजे काय आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण योग्य प्रकारे कसा उपयोग करावा?” यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी यादव यांनी तर रीतु शुक्ला यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये के 2
विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत, के 1 विद्यार्थ्यांचे प्रभावी भाषण, इयत्ता पहिलीचे देशभक्तीपर गीतावरील नृत्य, इयत्ता दुसरीचे आकर्षक पोम पोम नृत्य, इयत्ता ३ री, ४ थी व ५ वीच्या विद्यार्थ्यांचे दमदार लेझीम सादरीकरण, इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध परेड सादरीकरण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
यावेळी मुकुंद शहा व सौ. अंकिता शहा, भारत शहा व सौ. वैशाली शहा, डॉ. संजय शहा, अंगद शहा व सौ. रुचिरा शहा यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, शिक्षकांच्या नियोजनामुळे आणि व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे शाह ग्लोबल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा देशभक्ती, शिस्त, संस्कार आणि नवभारताच्या विकासाची प्रेरणा देणारा संस्मरणीय सोहळा ठरला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा