*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात सकल मुस्लिम समाज व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान येथे पैगंबर जयंती निमित्त सालाबादप्रमाणे यंदा हि अन्नदान वाटप करण्यात आले तसेच धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश या उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात आला.पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदत, अन्नवाटप तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविले.
या उपक्रमातून मानवता,शांतता,प्रेम आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. धार्मिक सण-उत्सव हे केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या हितासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी उपयोगी ठरावेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.विविध उपक्रमातून पैगंबर जयंती साजरी केल्याने शहरातील सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले यावेळी क.न.पा.नगरसेवक प्रशांत(आण्णा)ढाळे,महादेव(आण्णा)फंड,हुमरान मुलाणी,युवराज चिवटे,अमोल परदेशी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशन चे संस्थापक समिर शेख व सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमिर सय्यद यांनी केले होते यावेळी रोहित पवार फाउंडेशन चे ता.अध्यक्ष मुस्तकीम पठान(एम डी),रहेनुमा चे सुरज शेख,सचिव रमजान(पिंटु)बेग,जहांगीर बेग,उर्दु-शाळा स्थायी समिती सदस्य ईकबाल शेख,दस्तगीर पठान,शाहिद बेग इतर मान्यवर उपस्थित होते
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव समिती च्या वतीने पैगंबर जयंती निमित्त अन्नदान वाटप नगराध्यक्ष प्रतिनिधी व नगरसेवक संजय (अण्णा) सावंत व नगरसेवक हुमराण मुलाणी व अकबर सय्यद यांच्या शुभहस्ते श्रीराम प्रतिष्ठान येथे करण्यात आले
तसेच देवीचा माळ येथील मूकबधिर विद्यालय येथे फळ व खाऊ वाटप मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन भाऊ काळे व सकल मुस्लिम समाज शहराध्यक्ष जमीर सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले
त्यावेळी पैगंबर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरबाज बेग मार्गदर्शक अल्लाउद्दीन शेख .शाहिद बेग.अफताब शेख.शाहरुख शेख.सोहेल शेख.असीम बेग.समीर शेख. नदीम शेख. साहिल शेख. नवाज बेग. हुजैफ शेख जिशान पंजेवाला व पदाधिकारी उपस्थित होते







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा