Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २ ऑगस्ट, २०२६

करमाळा येथे नालबंद मंगल कार्यालयात मुस्लिम समाजाचा वधू वर सूचक मेळावा संपन्न

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  


मुस्लिम सोशल वेल्फेअर फाऊंडेशन, मस्जिद ए आयेशा नालबंद नगर करमाळा,हाजी महंमद इसहाक फराश फाऊंडेशन पुणे  यांच्या वतीने नालबंद मंगल कार्यालय येथे आज मुस्लिम वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात २८ वधू वराचीं नोंदणी झाली.        





                                  या मेळाव्याचे उद्घघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभुराजे जगताप व नगराध्यक्ष संजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक प्रशांत ढाळे,आदी मान्यवर उपस्थित होते 
यावेळी प्रास्ताविक मध्ये मौलाना सय्यदअली मुजावर यांनी सांगितले की मुस्लिम समाजात आता वधु वर सूचक मेळावा घेणे गरजेचे झाले आहे 



कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगताप म्हणाले की फराश फाऊंडेशन पुणे यांनी करमाळा येथे वधू वर मेळावा आयोजित करून माझ्या मुस्लिम बांधवांना या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले या संधीचा फायदा मुस्लिम समाजातील गुरजुंनी घ्यावा असे ते यावेळी म्हणाले 
यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी, दलीत सेनेचे लक्ष्मण भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
हा वधू वर सूचक मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी,रहैनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा कलीम काझी,हाजी महंमद शेख, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिस बागवान, पत्रकार नासीरभाई कबीर,इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष आजीम मोगल,रा काॅ चे शहर अध्यक्ष सोहेल पठाण,इंदाज वस्ताद, मौलाना कादर शेख, अफरोज पठाण  शाहरुख पठाण वडगाव जुबेर सय्यद शाहरुख नालबंद यांनी परिश्रम घेतले 
आभार फराश फाऊंडेशन पुणे चे अध्यक्ष इन्तेखाब फराश यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा