Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

*ईद-ए-मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंबर) जयंती निमित्त मंगरुळ येथे भव्य रक्तदान शिबिर ;महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*

 *मंगरूळ --प्रतिनिधी* 

*चांदसाहेब  शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती/ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे बुधवार २६ऑगस्ट रोजी सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ६३बहाद्दर रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी महिलांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला गाव परिसरातील महिला, युवक तसेच सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



   रक्तदान शिबिरात अनेक बहाद्दर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश दिला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने शिबिराला विशेष उत्साहाचे उधाण आले होते.

 कार्यक्रमास प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद दादा डोंगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन अण्णा सरडे, बीट अंमलदार वाघुलकर ,महेश डोंगरे, शिवसेनेचे विरेश डोंगरे, आप्पासाहेब जेटिथोर , विजय डोंगरे,अनंत उपासे हे उपस्थित होते


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जब्बार शेख यांनी तर सूत्रसंचालन व आभार पत्रकार चांदसाहेब यांनी केले 

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून धर्मासोबत मानवतेची सेवा आणि सामाजिक एकतेचा आदर्श मंगरुळ येथिल मुस्लिम बांधवांनी घालूनदिला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी भेट वस्तु व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले.

या उपक्रमामुळे बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमासाठी सत्तार मुलानी,आदमशा फकीर, ॲड. सद्दाम शेख,सोहेल बागवान, ॲड.जमीर शेख, नशीब शेख यांच्यासह मुस्लिम युवकांनी परिश्रम घेतले यावेळी मंगरुळ ग्रामस्थ, ज्येष्ठ मुस्लिम बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते 

"""""""""""""""""""""""""""""""""""

*चौकट*

*मुस्लिम युवकांनी यापूर्वीही सामाजिक सलोखा राखत शिवजयंती उत्सवात मसाला दूध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरबत, रमजान ईदच्या दिवशी संपूर्ण ग्रामस्थांना शिरखुमा सह स्नेह भोजनाचेही गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे या सामाजिक एकोप्यामुळे गावात समता, बंधुभाव व सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येते असाच समाजोपयोगी कार्यक्रम उत्तरोत्तर वाढावा अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा