*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या प्राप्त आदेशानुसार, पंचायत समिती करमाळा येथील गटविकास अधिकारी (BDO) स्तरावर कार्यरत असलेल्या 'महिला कर्मचारी कार्यस्थळी लैंगिक छळवणूक प्रतिबंध व निवारण समिती'वर (विशाखा समिती) विधीतज्ञ सदस्य म्हणून करमाळा येथील ज्येष्ठ वकील ॲड. विशाल दादासाहेब घोलप यांची निवड करण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे कायद्याच्या चौकटीत योग्य निवारण व्हावे, या उद्देशाने या समितीचे गठन करण्यात आले आहे. ॲड. विशाल घोलप यांच्या या निवडीमुळे पंचायत समितीच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना कायदेशीर मदत व न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
त्यांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
हार्दिक शुभेच्छा व सत्कार:-
ॲड. विशाल दादासाहेब घोलप यांच्या या निवडीबद्दल धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि घोलप परिवार, करमाळा यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील कायदेशीर व सामाजिक वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा