Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

*सोलापूर जवळ कुंभारी ते दोड्डी रोडवर २२ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला ;परिसरात एकच खळबळ*

 *सोलापूर --प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोलापूर शहरालगत मौजे कुंभारी ते दोड्डी रोडवर एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी खून झाल्याची चर्चा सुरू झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



भाग्यश्री नानासाहेब गायकवाड (वय ३२), राहणार रेणुका नगरी, जुळे सोलापूर यांचा मृतदेह दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे कुंभारी ते दोड्डी जाणाऱ्या रोडच्या बाजूला दगडू राठोड यांच्या शेताजवळ सापडला. 


भाग्यश्री दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घरातून निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह शहराच्या बाहेर कुंभारी-दोड्डी रस्त्यावर सापडल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी त्यांची दुचाकीही सापडली.  

 भाग्यश्री यांचे पती ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात. ते दुसऱ्या गावात ड्रायव्हिंगसाठी गेले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पती असा परिवार आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

भाग्यश्री त्या ठिकाणी कशासाठी गेल्या होत्या, हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. घटनास्थळी आणि परिसरात खून झाल्याची चर्चा होत होती. मृतदेहाजवळ एक मोठा दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा