Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

*सिंदफळ -(तुळजापूर) येथील श्री मुदगलेश्वर मंदिरात श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्त नागेश्वर अवतारातील शिव पूजेचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी*

 *तुळजापूर-- प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो;-9730867448*


श्रावण सोमवार व नागपंचमीनिमित्त तुळजापूरपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री मुद्गलेश्वर मंदिरात नागेश्वर अवतारातील शिवपूजा मांडण्यात आली होती. या आकर्षक शिवपूजेचे दर्शन घेण्यासाठी समस्त पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.


महादेवाचे हे मनोहारी रूप पाहून शिवभक्त भारावून गेले. भक्तिमय वातावरणात हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

तुळजापूर येथील काही तरुण मंडळी गेल्या ४० वर्षांपासून विविध रूपांमध्ये आकर्षक शिवपूजा मांडण्याची परंपरा जपत आहेत. श्री मुद्गलेश्वर महादेव सेवा समिती तथा मुद्गलेश्वर युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हे सेवाकार्य करण्यात येते.


दर श्रावण सोमवारी भक्तांसाठी महादेवाची विविध आकर्षक रूपांतील पूजा मांडण्यात येते. या उपक्रमामुळे परिसरातील शिवभक्तांना भक्तिभावाने महादेवाचे विविध रूपांचे दर्शन घेण्याची संधी मिळते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा