*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे मी माझा यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही असे आवाहन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील पुढे म्हणाले की सध्या करमाळा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे मी यावर्षीचा माझा वाढदिवस साजरा करणार नाही संकट काळात मी माझ्या तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे सध्या करमाळा तालुक्यामध्ये भयानक अशी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा मी माझा यंदाचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले
करमाळा तालुक्यात म्हणावा तसा अद्यप पाऊस झालेला नाही यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा करणे हे उचित समजले जाणार नाही त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन आहे की माझ्या वाढदिवसाला माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हार तुरे तसेच फेटे न आणता फक्त मला शब्दरूपी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा