*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला थांबा मंजूर करण्यात आला आहे.या निर्णयामुळे दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.या मागणीसाठी दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे सुयोग झोळ यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रवासी सेवा संघ,लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला.
झोळ यांनी सांगितले की प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील,खा.ओमराजे निंबाळकर,माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,युवा नेते दिग्विजय बागल
नगरसेवक दिपक चव्हाण,
संचालक गणेश झोळ,भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत साळुंके.
जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सुर्यवंशी
श्री प्रदीप पवार
यांच्या. सहकार्याने तसेच सोगाव,वाशिंबे, मांजरगाव,गोयेगाव,उंदरगाव आणि राजुरी येथील ग्रामपंचायती,तसेच अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय आणि पत्रकार संघ यांचे सहकार्य लाभले.
शेकडो निवेदने, ई-मेल, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे या मागणीला बळ मिळाले. अखेर रेल्वे बोर्डाने वाशिंबे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर केला.
प्रतिक्रिया
> “ही मागणी केवळ कागदावर मांडली नाही, तर दोन वर्षे सातत्याने प्रत्येक स्तरावर पाठपुरावा केला. अनेक अडचणी आल्या, निराशाही वाटली; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा या निर्णया मध्ये सिंहाचा वाटा आहे. परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला.सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेने थांबा मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरू असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल,
— सुयोग झोळ, वाशिंबे (ता. करमाळा)







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा