Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 मुख्य संपादक -

टाइम्स 45 न्युज मराठी

मो-9730867448


२५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मेजर गणपत जाधव यांच्या हस्ते ध्वज पूजा व ध्वजारोहन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला. तसेच विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव फळझाडे देवून करण्यात आला.




शाळेच्या संस्थापक व मुख्याध्यापिका नूरजहान शेख यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून देशप्रेम, एकता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमास पालक, शिक्षक, शाळेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 अबॅकस मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उद्या 16ऑगस्ट रोजी फिनिक्स स्कूल मध्ये करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा