*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
:अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारे मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मिरवणूक किल्लावेस येथून सुरू होऊन फुलसुंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, सुभाष चौक मार्गे पंजाब वस्ताद चौक येथे सांगता होणार आहे. अशी माहिती मिरवणुकीचे पदाधिकारी सुफ्रान नबी शेख यांनी दिली.
करमाळ्यातील मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी अल्ताफ हाजी हाशमोद्दिन तांबोळी, माजी नगराध्यक्ष शौकत हुसेन नालबंद तसेच सामाजिक कार्यकर्ते कलीम काजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये फिरोज (पप्पू ) पठाण– अध्यक्ष, युसुफ शेख – उपाध्यक्ष, सद्दाम शेख – सचिव तर शाहरुख नालबंद – मिरवणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचे विचार व शिकवण आचरणात आणण्याच्या उद्देशाने त्यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गोरगरिबांना कपडे वाटप, वृक्षारोपण, खाऊ वाटप तसेच प्रसादाचा मोफत लंगर अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
या भव्य मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सोहेल पठाण आझाद शेख अशपाक जमादार अफरोज पठाण मैनुद्दीन बेग शाहरुख शेख इरफान सय्यद आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा