इंदापूर, डॉ. संदेश शहा.
शनिवार ३ ऑगस्ट २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापुर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी.अवैध गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे व दोन मॅग्झीन असे एकुण ५८,०००.रु/ किंमतीचा मुददेमाल जप्त करून आरोपीस जेरबंद. करण्यात यश आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
दि.०१/०८/२०२६ रोजी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विनोद लोखंडे व लक्ष्मण सुर्यवंशी यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे मोहम्मदकमरूल हलीम मन्सुरी, वय २५ वर्ष, व्यावसाय-पंक्चर दुकाण, रा. गोखळी सोनाई डेअरी समोर ता.इंदापुर जि.पुणे मुळ रा. मधोल ता महुआ जि वैशाली रा. बिहार याने अवैध गावठी पिस्टल सह जिवंत काडतुसे व मॅग्झीन बाळगल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर बातमी मा. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना माहींती देवुन त्यांनी कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने सपोनी केकाण, पो.हवा शिंदे, पो.हवा रासकर पोलीस अंमलदार, सागर क्षिरसागर, अंकुश माने, विनोद लोखंडे, मोहन आंनदगावकर, लक्ष्मण सुर्यवंशी, योगेश कर्चे, राहुल शिंदे, सौरभ पाटील यांनी मोहम्मदकमरूल हलीम मन्सुरी यांस ताब्यात घेवुन सविस्तर विचारपुस केली असता त्याने त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे व एक मॅग्झीन असे असल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन एक गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे व दोन मॅग्झीन असा एकुण ५८,००० रू.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि गणेश केकाण हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही हि मा. संदिप सिंह गिल साो, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, श्री गणेश बिरादार साो, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, श्री. चैतन्य कदम साो, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग बारामती, यांचे मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विलास नाळे सो, सपोनी गणेश केकाण, पो.हवा. संतोष शिंदे, पो.हवा. विनोद रासकर पोलीस अंमलदार, विनोद लोखंडे, मोहन आंनदगावकर, लक्ष्मण सुर्यवंशी, योगेश कर्चे, राहुल शिंदे, सौरभ पाटील, सागर क्षिरसागर, अंकुश माने, नंदु जाधव यांनी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा