Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

*दिग्विजय बागल यांचा मुळ पाणंद रस्ता योजना समितीत समावेश नाही यामुळे मागील दारातुन येऊन घरमालक होण्याचा त्यांचा आव चुकीचा-- सुनील तळेकर*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे सध्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना समितीच्या सह अध्यक्ष पदावर निवड झाल्याने सगळीकडे सत्कार स्विकारत असतानाच आमदार नारायण आबा पाटील गटाकडून मात्र थेट त्यांच्या निवडीवरच प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की दिग्विजय बागल हे सध्या सगळीकडे आपल्या पक्षाकडून नियुक्ती केलेल्या पदाच्या बदल्यात श्रीफळ, शाल गोळा करण्यात मग्न आहेत. मुळात मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होता न आल्याने त्याची समजुत काढण्यासाठी या पानंद रस्ता योजना समितीत त्यांचा पक्षाकडून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना समीतीची रचना पाहिली असता या समितीच्या अध्यक्षपदी आमदार नारायण आबा पाटील हे आहेत. सह अध्यक्ष हे पद अस्तित्वातच नाही. या समितीच्या सचिव पदावर प्रांताधिकारी श्रीमती जयश्री आव्हाड ह्या आहेत. तसेच सदस्य म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कृष्णा अंजना, तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, तहसिलदार संजय भोसले, पोलीस निरीक्षक प्रतिनिधी पोपट टिळेकर, गटविकास अधिकारी अमित कदम, गटविकास अधिकारी महेश सुळे, उप अधीक्षक भुमिलेख करमाळा, उप अधीक्षक भुमिलेख माढा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम करमाळा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम माढा, उप अभियंता जि प बांधकाम करमाळा, उप अभियंता जि प बांधकाम माढा असे एकुण तेरा सदस्य मुळ समितीचे पदाधिकारी म्हणुन नियुक्त केलेले असुन कार्यरत आहेत. यात दिग्विजय बागल हे कुठेच नाहीत. शासनाच्या बळीराजा पानंद रस्ता योजना समितीच्या मुळ आराखड्यात दिग्विजय बागल यांची निवड होऊ शकत नसल्याने सरकारकडून काही कार्यकर्ते यात स्विकृत सदस्य म्हणुन नेमले गेले आहेत. अशाच प्रकारे दिग्विजय बागल यांची नेमणूक केली गेली आहे. परंतु या नेमणुकीचा आनंदोत्सव ते स्वतः साजरा करत फिरत आहेत. जणुकाही या समितीची सर्व काही सुत्रे त्यांच्या हातीच आहेत. मुळात असे काहीच नाही. आमदार नारायण आबा पाटील हे या समितीचे अध्यक्ष असल्याने अंतिम निर्णय हे अध्यक्ष म्हणून आमदार नारायण आबा पाटील हे घेणार आहेत. दिग्विजय बागल हे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणुन नसल्याचे निश्चित झाल्याने त्यांची बोळवण करण्यासाठीच या समितीमध्ये त्यांना नेमण्यात आले असल्याचा टोला तळेकर यांनी लगावला. तर दिग्विजय बागल यांनी शासकीय दप्तरातील समितीची यादी जाहीर करुन इपण मुळ समितीत आहोत हे प्रथम सिध्द करुन दाखवावे असे आव्हान पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा