Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

*काँग्रेसची पंकजा मुंडेंना मोठी ऑफर ?...भाजपमधून बाहेर पडा, मुख्यमंत्री व्हा!....*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


मुंबई : भाजप नेत्या आणि राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

काँग्रेस पक्षाने त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये (Congress) येण्याची आणि मुख्यमंत्री (CM) होण्याची थेट ऑफरही दिली आहे. पंकजा मुंडे यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु काँग्रेसच्या या विधानाने राजकीय समीकरणे बदलू शकतात अशा चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना ही थेट ऑफर दिली. ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचे प्रयत्न ‘गोपीनाथ मुंडे साहेब’ यांच्या निधनानंतर सुरू झाले. पंकजा मुंडे यांना पक्षात योग्य वागणूक मिळत नाही असे वाटत असेल आणि म्हणूनच अशा भावना व्यक्त होत असाव्यात, असे त्यांनी सुचवले. पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की, तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्त्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. काँग्रेस त्यांचे स्वागत करेल असे वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, त्या सामील होण्यास इच्छुक असल्यास पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.

विदर्भ क्षेत्रातील ११ जिल्ह्यांतून जाणारी ‘मंडल यात्रा’ आजपासून सुरू होत आहे. या जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर यात्रेचा समारोप होईल. ओबीसी समाजासाठी जातिनिहाय जनगणना करणे ही या यात्रेची प्रमुख मागणी आहे. तसेच, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही केली जात आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचे कल्याण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ‘महाज्योती’ला (राज्याचा ओबीसी कल्याण महामंडळ) १ हजार कोटी रुपये मिळण्यावर अवलंबून आहे. त्यांनी ओबीसींसाठीच्या १ लाख रिक्त जागांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची आणि ओबीसी समाजासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणीही केली.

उद्योजकांना खूश करण्याचा उद्देश?शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने संपादित केल्या जात आहेत. या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास आता लोकांना भीती वाटत आहे. या रस्त्याची अवस्था दयनीय कशी झाली माहित नाही. केवळ मोठ्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांची मोठी कंत्राटे दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जमिनीचे भाव लाखो रुपयांपर्यंत पोहोचले असून गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत प्रशासन पोलिसांचा वापर करून अत्यंत कमी दराने जमिनींचे जबरदस्तीने सर्वेक्षण करत आहे. ही लालसा म्हणजे सरकारला मिळणारी ‘लाच’ हे की उद्योगपतींना खूश करण्याचा प्रयत्न? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.त्यामुळेच ‘ते’ फलक लागल

नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे फलक शहरात लागले आहेत. त्याबाबतही त्यांनी भाष्य केले. नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशातून कंत्राटदार आणले गेले होते, तरीही पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये त्यांची सर्व कामे वाहून गेली. हेच कंत्राटदार कोणतीही कडक अट पूर्ण न करता कंत्राटे मिळवतात आणि ३० टक्के नफा खिशात घालतात. यामुळे जनता संतापली असून या परिस्थितीला दोष देत आहे. बोगस कंत्राटदारांकडून होणाऱ्या लुटीमुळे जनतेत जो संताप आहे, त्यातूनच असे फलक लावले गेले असावेत, असे म्हणत वडेट्टीवार यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा