Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

*प्रा. डॉ. अमोल बाळासाहेब बंडगर यांनी पी.एच.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सत्कार यांचा सत्कार*

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


जीवशास्त्र विषयातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल Olympiad Examination Council कडून Doctor of Philosophy (Ph.D.) ही मानद पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. अमोल बाळासाहेब बंडगर यांचा माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार . उत्तमराव जानकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पीएचडी पदवीचे प्रशस्तीपत्र प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला.



हा सत्कार सोहळा अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी मा. लक्ष्मीकांत वाघे (अकलूज उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य),  . दिलीप तात्या होणमाने (अध्यक्ष), . नागेश्वर पोटे (उपाध्यक्ष),  निलेश ठोंबरे, . अमर गडदे (खजिनदार) तसेच  परशुराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.

यावेळी आमदार . उत्तमराव जानकर यांनी प्रा. डॉ. बंडगर यांचे अभिनंदन करत त्यांच्या शैक्षणिक, संशोधन व समाजाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी असतात. प्रा. डॉ. बंडगर यांच्यासारख्या अभ्यासू व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान हा संपूर्ण माळशिरस तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अमोल बाळासाहेब बंडगर यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, मार्गदर्शक, सहकारी, विद्यार्थी आणि सर्व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रा. डॉ. बंडगर यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा