*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिवगिरी अँग्रो शुगर वर्क्स प्रा. लि. विहाळ, ता. करमाळा येथे गळीत हंगाम 2026-27 च्या प्रित्यर्थ रोलर पुजन सोहळा शनिवार दिनांक 08/08/2026 रोजी दुपारी 2.00 वाजताचे शुभमुहुर्तावर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.
कारखान्याचे चेअरमन मा. कालीदास आबा सावंत यांचे शुभहस्ते मिल रोलरचे विधीवत पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. श्री. प्रा. *शिवाजीराव सावंत* सर हे होते.
यावेळी मा. श्री. धनंजय दादा सावंत (जिल्हा परिषद सदस्य धाराशिव), कारखान्याचे व्हा. चेअरमन मा. संजय कालीदास सावंत, तसेच राजवी अँग्रो कारखान्याचे व्हा. चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. पृथ्वीराज (भैय्या) सावंत शिवगिरी अँग्रो कारखान्याचे मार्गदर्शक किरण तात्या सावंत, तसेच संचालक मा. अजिंक्यभैय्या सावंत, मा. सचिन तोडकरी यांचे उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी शेतकऱ्यांनी दर्जेदार उसाचे उत्पादन घेऊन कारखान्यास परिपक्व ऊस पुरविल्यास कारखान्याचे चांगले गाळप होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होईल असे आवाहन केले.
त्यामुळे सर्वांनी वेळेत तोडणी वाहतुक करून दर्जेदार ऊस कारखान्यास द्यावा. तसेच कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दुरुस्तीची कामे वेळेत पुर्ण करून कारखाना निर्धारित वेळेत गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या सर्वांच्या एकजुटीतुनच कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी होईल असे म्हणाले.
यावेळी येणारा गळीत हंगाम शेतकरी, कर्मचारी तसेच तोडणी वाहतुकदार यांच्यासाठी लाभदायी व विक्रमी व्हावा या करीता संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. राजेंद्र देशमुख, चिफ केमिस्ट श्री. पुडलिक सांगळे, कारखान्याचे वित्तविभाग प्रमुख राहुल तांबे, शेती अधिकारी रामदास चव्हाण, स्टोअर किपर देवराव राठोड, हेड टाईम किपर भाऊराव गोडगे प्रगतशिल शेतकरी युवराज नाना रोकडे, मच्छिंद्र थिटे गोडाऊन विभाग प्रमुख बाळासाहेब काळे, करमाळा, कर्जत, जामखेड व परांडा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. राजेंद्र देशमुख यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा