*मंगरूळ --प्रतिनिधी*
*चांदसाहेब शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
पावसाळ्यास सुरवात होऊन तब्बल तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे परंतु समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड चिंताग्रस्त झाला आहे जेमतेम पडलेल्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिके डोलू लागली होती परंतु गेल्या आठ ते दहा दिवसापासून दडी मारलेल्या पावसामुळे सोयाबीन मान टाकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे मंगरुळ व परिसरातील जलसाठे कोरडेठाक पडले असून विहिरी व कूपनलिकानिही तळ गाठला आले यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नसल्याने जलसाठे, विंधन विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या आठ तेदहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिके जागेवरच करपून जात आहेत हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला जाणार की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे पावसासाठी परिसरातील ग्रामदेवता यांना साकडे घातले जात आहे एक दोन दिवसांत रिमझिम पावसाने हजेरी लावली तरी सोयाबीन तरले जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा